Today-Current-affairs-in-Marathi-23-May

Career Katta
2 min readMay 23, 2021

--

मित्रांनो,

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडीचा दररोज अभ्यास करणे महत्वाचे आहे या शिवाय आधीच्या घडामोडीचा मागोवा घेणे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणूनच careerkatta21 तुमच्या साठी परीक्षाभिमुख चालू घडामोडी घेऊन येत आहे.

या सर्व घडामोडी तुम्हाला या careerkatta21.com या वेबसाइटवर दररोज पाहावयास मिळतील. तुम्ही दररोज या वेबसाइट वर भेट देऊन चालू घडामोडीचा अभ्यास करू शकता. आशा करतो की तुम्हाला careerkatta21.com वर अपलोड केलेल्या current affairs आवडतील आणि तुमच्या ज्ञानाची भूक भागवतील.

MPSC-Current-affairs-23-May

1) नुकतेच निधन झालेले ‘सुंदरलाल बहुगुणा’ हे कोण होते?

अ. लेखक

ब. पर्यावरणवादी

क. गायक

ड. समाज सुधारक

  • जन्म: ९ जानेवारी १९२७ टिहरी (उत्तराखंड)
  • १३ वर्षाचे असताना देव सुमन यांच्या मुळे ते अहिंसा तत्वाने देशकर्यासाठी प्रेरित झाले.
  • त्यांनी पारतंत्र्य विरोधात सभा घेतल्या आणि पत्रके वाटली.
  • १९६५ ते १९७० या काळात टिहरी आणि सभोवतालच्या परिसरात दारूबंदी केली.
  • हिमायलातील झाडे, जंगले नष्ट करणाऱ्या ठेकेदारांन विरुद्ध आंदोलन सुरू केले हेच ते चिपको आंदोलन. हिमालयातील ही चळवळ पुढे संपूर्ण भारत पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुरू झाली.
  • या आंदोलनाचे वैशि्टय म्हणजे स्त्रिया एकत्र येऊन झाडला मिठी मारत असत. आधी आमची हत्या मग वृक्षांची करा हेच त्याचं ब्रीद वाक्य होत.
  • कर्नाटकातील अप्पीको या चळवळीची प्रेरणा घेऊन चिपको आंदोलन सुरू झाले.
  • या आंदोलना ला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्री पर्यावरण वाद असे ओळखले जाते.
  • टिहरी धरण बांधण्यात येऊ नये या साठी त्यांनी शेवट पर्यंत विरोध केला.

त्यांना मिळालेले पुरस्कार

  • पद्मश्री १९८१
  • जमनालाल बजाज १९८६
  • राईट लाईवलीहुड १९८७
  • आयआयटी रुरकी कडून सामाजिक शास्त्राची डॉक्टरेट पदवी १९८९
  • पद्मविभूषण २००९

खऱ्या अर्थाने ते पर्यावरण गांधी होते.

2) ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन’ कधी साजरा केला जातो?

अ. 19 मे

ब. 20 मे

क. 21 मे

ड. 22 मे

3) कोणती कंपनी भारतात सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केबल प्रणाली (International submarine cable system) तयार करीत आहे?

अ. अदानी ग्रुप

ब. टाटा ग्रुप

क. रिलायन्स जिओ

ड. यापैकी नाही

4) कोणत्या बँकेने ‘डिजिटल लोन प्रोसेसिंग सिस्टम’ सुरू केले आहे?

अ. BOB

ब. IDBI

क. HDFC

ड. SBI

Read More: 22 May Current Affairs in Marathi

Read More: 21 May Current Affairs in Marathi

5) चीनमध्ये टियानवान व झुदापू अणुऊर्जा प्रकल्प कोणच्या सहकार्याने बांधला जात आहे?

अ. रशिया

ब. फ्रान्स

क. जपान

ड. यापैकी नाही

Read More: 20 May Current Affairs in Marathi

Read More: 19 May Current Affairs in Marathi

--

--

Career Katta
Career Katta

Written by Career Katta

0 Followers

This blog share daily current affairs in Marathi. We will make weekly quiz on current affairs.

No responses yet